पत्रदेवी महामार्गावर भीषण अपघात…

कार चालकाने उभ्या ट्रकला दिली मागाहून जोरदार धडक:एक इसम ठार..

⚡बांदा ता.१७-: गोव्यातून लातूरकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला पत्रादेवी चेकपोस्टवर भीषण अपघात झाला आहे. कार चालकाने उभ्या ट्रकला मागाहून जोरदार धडक दिली. या अपघातात एक इसम ठार झाला असून एका पुरुषाची प्रकृती चिंताजनक आहे.

तसेच पाच लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. पैकी दोन लहान मुलांना तातडीने गोवा बांबोळी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. कार चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले असून त्यालाही उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर एका गंभीर जखमी महिलेला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात पाठवण्यात आले. हा अपघात पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडला. कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे.

You cannot copy content of this page