नारायण मंदिरात राम जन्मोत्सव उत्साहात संपन्न…

सावंतवाडी : श्री देव नारायण मंदिर सावंतवाडी येथे विश्व हिंदू परिषद सावंतवाडी प्रखंड आणि सकल हिंदू धर्मिया तर्फे श्री राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात आली.

श्री देव नारायण मंदिर,शिवउद्यान,सालईवाडा,बाजारपेठ मार्गे ही शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी युवराज लखमराजे भोंसले, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष केशव फाटक, प्रखंड मंत्री विनायक रांगणेकर, प्रसिद्धी प्रमुख किशोर चिटणीस, प्रसाद अरविंदेकर, प्रकाश रेडकर, अण्णा म्हापसेकर, राजू केळूसकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, अँड. संजू शिरोडकर, दिलीप भालेकर, स्वागत नाटेकर, मोहिनी मडगावकर, अँड. अश्विनी लेले, कृष्णा धुपळणवर, विनोद सावंत, गौतम माठेकर, प्रथमेश प्रभू, सुरज मठकर, संदीप निवळे, जीजी राऊळ, ओंकार सावंत, सुनिल सावंत, देवदास सावंत, विनोद सावंत, राजू गोवेकर आदींसह मोठ्या संख्येने रामभक्त उपस्थित होते.

You cannot copy content of this page