३० मे नंतर करुळ घाट वाहतुकीस खुला करा…

जिल्हाधिकारी किशोर तावडे:महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी..

वैभववाडी (प्रतिनिधी)
३० मे नंतर करू घाटातील वाहतूक सुरू झाली पाहिजे. त्या पद्धतीने कामाचे नियोजन करून युद्धपातीवर काम करा. अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. तर भुईबावडा घाटातून अवजड वाहतूक सुरू करणे बाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. करुळ घाटात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी भेट दिली व प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.
सध्या करूळ घाटात नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे जड अवजड वाहतूक राधानगरी व अनुसकुरा घाटातून तर हलकी व प्रवासी वाहतूक सुरू आहे. भुईबावडा घाटातून जड वाहतूक बंद असल्यामुळे जिल्ह्यातील वाहतूकदराची अडचण होत आहे. या घाटातून जळ वाहतूक सुरू करण्याची मागणी वाहतूकदार संघटन या घाटातून जळ वाहतूक सुरू करण्याची मागणी वाहतूकदार संघटना कडून करण्यात येत आहे.
मी पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तावडे यांनी करुळ व भुईबावडा घाटाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार सूर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण जाधव, अभियंता अतुल शिवनीवर, सार्वजनिक बांधकामाचे उपाधियंता विजय जोशी, श्री दुडीये, करुळ घाटाचे ठेकेदार मिलिंद वेल्हाळ अधि उपस्थित होते.
करुळ घाटातील रस्त्याचे काम दर्जेदार व जलद संगतीने करून 31 मे अखेर घाटातून वाहतूक सुरू करण्याचे नियोजन करा. अशी सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांना केली. त्यांनी ते मान्य केले आहे.
त्यानंतर त्यांनी भुईबावड्या घाटाची पाहणी केली. भोईवाडा घाटातून जड वाहतूक सुरू करावी अशी मागणी वाहतूकदार संघटना, बागायतदार शेतकरी यांनी जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्याचप्रमाणे आमदार नितेश राणे यांनी ही या प्रश्नाकडे जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले होते. या घाटाची पाहणीही जिल्हाधिकारी यांनी केली. या घाटातून अवजड वाहतूक करण्यात या घाटातून अवजड वाहतूक करताना सुरक्षितेबाबत सूचना केल्या. जास्त लांबीची वाहने या घाटातून करता येणार नाही. बाकीची वाहतूक कमी वेगाने करावी लागेल. अवजड वाहतूक सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. असे त्यांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page