⚡सावंतवाडी ता.१६-: माजी आमदार शिवराम दळवी यांनी आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या गुरुकुल या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. सदरची भेट ही राजकीय होती की अन्य काही हे समजू शकले नाही मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट चर्चेचा विषय बनला आहे.
दरम्यान दळवी यांचे राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष बंटी माटेकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक उमेश कोरगावकर माजी नगरसेवक विलास जाधव मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप पवार श्री सांगेलकर यावेळी यावेळी उपस्थित होते.
