आरोग्य शिबिरात ७० जणांनी तपासणी…

⚡वेंगुर्ला ता.१६-: वेंगुर्ला-आनंदवाडी येथे डॉ.आंबेडकर जयंती निमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा ७० जणांनी लाभ घेतला. उद्घाटन वेंगुर्ला आगार व्यवस्थापक राहूल कुंभार, सेवानिवृत्त जिल्हा न्यायालय अधिक्षक एन.पी.मठकर यांच्या हस्ते झाले.

  आरोग्य शिबिरात कुडाळ येथील माधवबागचे डॉ. अमेय पाटकर, डॉ.समिक्षा रहाटे, राकेश सोनवडेकर, कृतिका सपकाळ, निशा पावसकर, संदिप चेंदवणकर आदींनी रूग्णांची ईसीजी, शुगर व इतर तपासणी केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल जाधव, उपाध्यक्ष गजानन जाधव, मोनाली जाधव, प्रेमानंद जाधव, जयंत जाधव, सुहास जाधव, सुहानी जाधव, वृषाली जाधव, लाडू जाधव, वाय.जी.कदम, वामन कांबळे, सुरेश जाधव व अन्य उपस्थित होते.
You cannot copy content of this page