⚡कणकवली ता.१५-: शहरातील निम्मेवाडी येथील प. पू. चित्स्वरुप फलाहारी रघुपतीधाम अश्रामात बुधवार 17 एप्रिलला राम जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
सकाळी 10 वा. पादुका पूजन, अभिषेक, 11 वा. जानवली येथील कीर्तनकार कार किशोर राणे यांचे कीर्तन, दुपारी 12.30 राम जन्मोत्सव, 1 वा. श्री स्वयंभू मंदिर ते विश्रांतीधामपर्यंत पालखी मिरवणूक, 1.30 वा. आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी 7 वा. भजने सादर होतील. तरी या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रघुपती धाम आश्रमातर्फे करण्यात आले आहे.
रघुपतीधाम आश्रमात उद्या राम जन्मोत्सव सोहळा…
