⚡कणकवली ता.१५-: बालगोपाळ हनुमान मित्रमंडळातर्फे शहरातील-कांबळे गल्ली येथील बाल हनुमान मंदिरात मंगळवार 23 एप्रिलला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहे.
पहाटे 5 वा. हनुमान जन्मोत्सव सोहळा, 8 वाजल्यापासून श्रींची पूजा व अभिषेक, तीर्थप्रसाद, 11.30 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, श्रींची महाआरती, तीर्थप्रसाद, दुपारी 1 वा. महाप्रसाद, सायंकाळी 7.30 वा. भजनांचा कार्यक्रम, 8 वा. बाळगोपाळ हनुमान मित्रमंडळ प्रस्तुत ‘जल्लोष 2024’ हा कार्यक्रम होणार आहे. तरी या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
हनुमान जयंतीनिमित्त कणकवलीत कार्यक्रम…
