नांदगावात उद्या बक्षीस वितरण सोहळा…

⚡कणकवली ता.१५-: नांदगाव विकास मंडळ, मुंबईच्यावतीने नांदगाव येथील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या आंतरशालेय विविध शैक्षणिक स्पर्धा 2024 चा पारितोषिक वितरण सोहळा मंगळवार 16 एप्रिलला 10. 30 वा. सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे आयोजित केला आहे.


या सोहळ्याला वैश्य गुरूमठ हळदीपूर अध्यक्ष अशोक नर, नांदगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था अध्यक्ष नागेश मोरये, नांदगाव विकास मंडळाचे अध्यक्ष गजानन रेवडेकर, सरचिटणीस नामदेव मोरये, खजिनदार लक्ष्मण रेवडेकर, शैक्षणिक स्पर्धा प्रमुख संजीव शिरसाट, समन्वयक अनाजी सावंत, सुधीर सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदरची स्पर्धा इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये घेण्यात आली होती. स्व. माधव नांदगावकर याच्या प्रथम स्मृतीदिन, शिक्षणमहर्षी स्व. दामोदर मराठे याचा व्दिशतक स्मृतीदिन व स्व. सावित्री रेवडेकर त्रिशतक स्मृतीदिन पित्यर्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तरी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन नांदगाव विकास मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page