⚡कणकवली ता.१५-: कलमठ-बाजारपेठ येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात बुधवार 17 एप्रिलला श्री राम जन्मोत्सव साजरा केला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी 10 वा. घटस्थापना, 11 वा. कीर्तन, दुपारी 12 वा. श्री राम जन्मसोहळा, सायंकाळी 7 वा. भजने सादर होणार आहेत. तरी या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई मंदिर व्यवस्थापन कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.
कलमठमध्ये उद्या राम जन्मोत्सव सोहळा…
