भाजप युवा मोर्चाने केले डॉ आंबेडकर यांना अभिवादन…

मालवण दि प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त आज मालवण बांगीवाडा येथील समाज मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर व रोहन पेंडूरकर यांच्या सहित अन्य सहकार्य व भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर, भारतीय जनता युवा मोर्चा मालवण शहर अध्यक्ष ललित चव्हाण, फ्रान्सिस फेर्नांडीस, रोहन पेंडुरकर, नितेश पेंडुरकर, राहुल पेंडुरकर, अमित जाधव, महेश जाधव, भूषण मालवणकर, चंदन जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page