राजकोट किल्ला 20 एप्रिल पर्यत पर्यटकांसाठी बंद…

⚡मालवण ता.१४-:
मान्सून पूर्व देखभाल कामांसाठी राजकोट किल्ला 20 एप्रिल पर्यत पर्यटकांसाठी बंद रहाणार आहे. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे.

नौदल विभागाच्या वतीने राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्राथमिक देखभाल केली जात आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, 20 एप्रिल पर्यत राजकोट किल्ला पर्यटनासाठी बंद राहील. असा सूचना फलक राजकोट किल्याच्या प्रवेश द्वारावर लावण्यात आला आहे.

फोटो : राजकोट किल्याच्या प्रवेश द्वारावर लावण्यात आलेला सूचना फलक.

You cannot copy content of this page