डाॅ. आंबेडकर यांना विनायक राऊत यांनी केले अभिवादन…

⚡कणकवली ता.१४-: भातरतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील बुद्ध विहार परिसरातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत खासदार विनायक राऊत यांनी अभिवादन केले.
यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख नीलम पालव, वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, रुपेश नार्वेकर, निसार शेख, रामदास विखाळे, सुजीत जाधव, धीरज मेस्त्री, राजू राठोड, सचिन खोचरे, नीतेश भोगले, अंकुश कदम, संदीप कदम, सूर्यकांत कदम, श्रद्धा कदम, रोहन कदम यांच्यासह आबेडकरांचे अनुयायी उपस्थितीत होते.
बुद्धविहार येथील भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विनायक राऊत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पाशवी बहुमताच्या जोरावर केंद्रातील सत्ताधारी संविधान बदलू पाहत आहेत. त्यामुळे संविधानाचे अस्तित्व व लोकशाही टिकून राहण्यासाठी सत्ताधार्‍यांना देशवासीयांनी धडा शिकवावा, असे आवाहन विनायक राऊत यांनी केले. यावेळी युवासेनेतर्फे बुद्धविहार येथे युवक व युवतींना लिखित स्वरुपातील संविधानाचे देण्यात आले.

You cannot copy content of this page