गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज आमदार जीत आरोलकर यांच्या महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार…

सायंकाळी ४.३० वाजता कळस मांगर सभागृह मोरजीम येथे घेणार बैठक..

⚡मांद्रे ता.१४-: भाजपचे उत्तर गोव्याचे लोकसभेचे उमेदवार श्रीपाद भाऊ नाईक यांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आज आमदार जीत आरोलकर यांच्या मांद्रे मतदारसंघात झंझावती दौरा आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत हे विविध ठिकाणी बैठकीचा धडाका घेऊन कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते तसेच पर्यटन व टॅक्सी व्यवसायिकांशी चर्चा करून मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती आमदार जीत आरोलकर यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत आज सायंकाळी ४.३० वाजता आमदार जीत आरोलकर यांच्या मांद्रे मतदारसंघातील महिला बूथ सदस्यांना संबोधित करून मार्गदर्शन करणार आहेत.
सदरचा महिला मेळावा कळस मांगर सभागृह मोरजी-पेडणे गोवा येथे संपन्न होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.४५ वाजता आमदार जीत आरोलकर यांचे कार्यकर्ते, हितचिंतक व येथील पर्यटन व्यवसायाशी निगडित व्यावसायिक यांना मुख्यमंत्री डॉ. सावंत हे सार्वजनिक गणेशोत्सव सभागृह हरमल-पेडणे गोवा येथे मार्गदर्शन करणार आहेत.
सायंकाळी ७ वाजता मुख्यमंत्री डॉ. सावंत हे आमदार जीत आरोलकर यांच्या मांद्रे मतदारसंघातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच आमदार आरोलकर यांचे कार्यकर्ते यांना झेडपी सभागृह मांद्रे पेडणे गोवा येथे मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ७.३० वाजता आमदार जीत आरोलकर यांचे कार्यकर्ते, हितचिंतक व टॅक्सी व्यावसायिक यांच्याशी झेडपी सभागृह मांद्रे पेडणे गोवा येथे चर्चा करून मार्गदर्शन करणार आहेत.
सायंकाळी ८.३० वाजता मुख्यमंत्री डॉ. सावंत हे विरनोडा गोवा येथे आमदार जीत आरोलकर यांच्या बूथ कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी प्रचारासंदर्भात चर्चा करून मार्गदर्शन करणार आहेत. मांद्रे मतदारसंघातून श्रीपाद भाऊ यांना अधिकाधिक मताधिक्य देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page