डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नारायण राणेंनी केले अभिवादन…

⚡कणकवली ता.१४-: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील बुद्ध विहार परिसरातील डॉ. आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याला केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.

यावेळी आमदार नीतेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, बौद्ध विकास संघाचे तालुकाध्यक्ष अकुंश कदम, शहराध्यक्ष अण्णा कोदे, सुजय कदम, सुनील तांबे, संदीप तांबे, विजय खरात, मालोजी कोकरे, महानंदा चव्हाण, संजय कांबळे, दिपेश मणचेकर, निरंजन तळगावकर, संजय कदम, नंदू पवार, श्री. गोठणकर, सुनील तांबे, किरण जाधव, कमलेश नरे यांच्यासह बाबासाहेबांचे अनुयायी उपस्थितीत होते. देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली. संविधानाच्या आधारावर देश प्रगतीकडे मार्गक्रमण करत आहे, असे प्रतिपादन नारायण राणेंनी केले. तत्पूर्वी बुद्धविहारमधील भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला राणे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

You cannot copy content of this page