⚡कणकवली ता.१३-: संकल्प प्रतिष्ठानतर्फे रविवार १४ एप्रिलला सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत वागदे गोपुरी आश्रमातील बहुउद्देशीय सभागृहात ‘फणस लागवड व फणस प्रक्रिया एक उद्योगसंधी’ या विषयावर मोफत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त व युवा कृषी उद्योजक मिथिलेश देसाई हे मार्गदर्शन करणार आहे. तरी नवउद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले.
गोपुरीत उद्या कृषी विषयक मार्गदर्शनपर कार्यक्रम…
