⚡कणकवली ता.१३-: शहरातील व्यापाऱ्यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या व प्रश्न राणे यांच्याकडे मांडले. याशिवाय विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी आमदार नीतेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, जिल्हा व्यापारी संघाचे उपाध्यक्ष महेश नार्वेकर, विशाल कामत, सुशील पारकर, पाहुजा सुरबा गावकर, अशोक करंबेळकर, डॉ. सुहास पावसकर, राजन पारकर, राजेश काळगे, बाबू वळंजू दयानंद उबाळे, भेराराम राठोड, बाबू मालवीय, प्रसन्ना देसाई, गणेश कुडाळकर, मंगेश तळगावकर, मंगेश तळगावकर, बंडू गांगण, अण्णा कोदे हे उपस्थित होते.
