⚡बांदा ता.१३-: युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगावे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत टॅलेंट सर्च परीक्षेत बांदा नं.१केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत एकूण २०पदकांची कमाई केली आहे.
युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने चालू वर्षी फेब्रुवारी २०२४मध्ये दुसरी तिसरी चौथी , सहावी व सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत दरवर्षी प्रमाणे यावर्षीही बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी सुयश मिळवले असुन इयत्ता तिसरी इयत्तेतील समर्थ सागर पाटील याने टाॅप फिफ्टी मध्ये स्थान मिळवले आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे उपाध्यक्ष संपदा सिध्दये मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये यांनी अभिनंदन केले असून या विद्यार्थ्यांना उर्मिला मोर्ये,स्नेहा घाडी,सुजाता सावंत, रसिका मालवणकर शांताराम असनकर, रंगनाथ परब,जे.डी.पाटील, शुभेच्छा सावंत, जागृती धुरी मनिषा मोरे सपना गायकवाड, स्नेहा कदम, यांचे मार्गदर्शन लाभले.
