श्री गावडे काका महाराज यांच्याकडून कारीवडेतील गरजू महिलेला घरासाठी धनादेश…

बांदा/प्रतिनिधी
श्री श्री १०८ महंत मठाधिश प. पू. सदगुरु श्री गावडे काका महाराज संस्थापीत श्री सदगुरू भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी या सामाजीक संस्थेने समाज बांधीलकी जपत निराधारांना आधार या योजनेखाली सावंतवाडी तालूक्यातील कारीवडे गावात राहणाऱ्या पार्वती शंकर मेस्त्री या गरीब व गरजू कुटुंबाला घर बांधणीसाठी आर्थिक मदतीचा धनादेश दिला.


श्रीमती मेस्त्री या महिलेला सहा मुले असून त्यातील तीन मुले ही शारीरिक विकलांग आहेत. पतीचे निधन झाल्यानंतर त्या मोलमजुरी करून घर चालवीतात. श्री सदगुरू भक्त सेवा न्यास या सामाजीक संस्थेच्या वतीने श्रीमती मेस्त्री यांना घर बांधण्यासाठी पंचवीस हजार रुपयांचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय किनळेकर यांच्या हस्ते कारीवडे उपासना केंद्रामध्ये प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचीव राकेश केसरकर, केंद्राध्यक्ष मनीष नाईक, रमाकांत उर्फ बाळा मेस्त्री, महिला प्रमुख सौ. त्रिवेणी आमोणेकर, तुकाराम आमोणेकर, जानकी परब, रूक्मिणी परब, सुनीता परब, सौ. रूपाली मेस्त्री, कृष्णा मेस्त्री, सुनीता मेस्त्री, किरण मेस्त्री, प्रतीश मेस्त्री, चिंतामणी मेस्त्री, प्रसाद मेस्त्री, सुप्रिया मेस्त्री आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राकेश केसरकर यानी केले. दतात्रय किनळेकर यानी संस्थेच्या विवीध योजना व प्रगतीपर वाटचाल, सदगुरूचे मिळणारे अमृततुल्य मार्गदर्शन याबाबत आपले विचार व्यक्त केले. आभार मनीष नाईक यानी मानले.
फोटो :-
कारिवडे येथे श्रीमती पार्वती मेस्त्री यांना धनादेश प्रदान करताना अध्यक्ष दत्तात्रय किनळेकर. सोबत सचीव राकेश केसरकर, मनीष नाईक, बाळा मेस्त्री, तुकाराम आमोणेकर व इतर.

You cannot copy content of this page