⚡दोडामार्ग ता.११-: युवासेनेच्या दोडामार्ग तालुकाप्रमुख पदी भगवान गवस यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली.शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक आणि युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी भगवान गवस यांची फेरनिवड केली.यावेळी दोडामार्ग शहर प्रमुखपदी गोकुळदास बोन्द्रे यांचीही नियुक्ती करण्यात आली.सावंतवाडी येथे कार्यक्रम झाला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, प्रेमानंद देसाई, ऍड. नीता सावंत – कविटकर, अनारीजिन लोबो आदी उपस्थित होते.
