सुदाम यांची राजकीय कारकीर्द उंचावत जावो ; बिडवाडी सरपंच सुदाम तेली यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव…

सामजिक बांधिलकी जपत बिडवाडीवासीयांनी लाडक्या सरपंचाचा वाढदिवस केला साजरा_

*💫कणकवली दि.२४-:* वाढीदवस म्हटलं की हारतुरे, डीजे आणि भव्यदिव्य कार्यक्रम हे समीकरण झाले आहे.या समीकरणाला फाटा देत शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बिडवाडी सरपंच सुदाम तेली यांचा वाढदिवस सामजिक बांधिलकी जोपासत सेवाभावी कार्यक्रमांनी बिडवाडीवासीय आणि सुदाम तेली मित्रमंडळाने साजरा केला. पक्षीय भेदभाव न ठेवता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी बिडवाडी सरपंच सुदाम तेली नेहमीच कार्यरत असतात. सामान्य कार्यकर्ता ते लोकनियुक्त सरपंच ही सुदाम तेली यांची राजकीय कारकीर्द उल्लेखनीय आहे. गावच्या विकासकामांसाठी सरपंच तेली कायम खासदार, पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करत असतात. केवळ बिडवाडी गावचेच नव्हे तर पं स आणि जि प मतदारसंघाचे नेतृत्व सुदाम तेली यांनी करावे. तेली याना लागणारी सर्वतोपरी मदत शिवसेनेच्या माध्यमातून केली जाईल. सर्वमान्य आणि सर्वसमावेशक असे सुदाम तेली यांचे नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार शिवसेना नेते संदेश पारकर यांनी याप्रसंगी काढले. सुदाम तेली यांच्या वाढदिवसानिमित्त जानवली जि.प.मतदारसंघातील 11 गावांमध्ये सॅनिटायजर फवारणी मोहिमेचा शुभारंभ शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आला. सरपंच तेली यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बिडवाडी गावातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि मास्क वाटपही करण्यात आले. बिडवाडी उपकेंद्रांतर्गत गंभीर आजारांवर उपचार घेत असलेल्या रुग्णांना गरोदर मातांना मोफत फळवाटप करण्यात आले. त्यानंतर शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बिडवाडी ग्रा पं सभागृहात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कणकवली नगरपंचायत चे विरोधी गटनेता तथा नगरसेवक सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, माजी जि प सभापती संदेश पटेल, बिडवाडी उपसरपंच सुरेश बावकर, दादा भोगले, माजी सरपंच दया हिंदळेकर, विश्राम लाड, दिनानाथ मगर, नामदेव राणे, आनंद साटम, प्रशांत चव्हाण, संजय पोळ, रमेश आचरेकर, ललित बावकर, सूर्यकांत चव्हाण, अभिमन्यू लाड, मधुकर वाडेकर, दीपक मगर, दिलीप भोगले, सचिन चव्हाण, नाना खांदारे, विकास राणे, कोरोना काळात स्वतःच्या जीवाची बाजी लावून आरोग्य सेवा देणाऱ्या आणि कोरोना शी लढा देणाऱ्या बिडवाडी गावातील कोरोना योद्ध्यांचा शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बिडवाडी गावातील सर्व अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस, आशाताई,गावचे पोलीस पाटील, कोव्हीड काळात कार्यरत असलेली ग्रामसनियंत्रण समिती सदस्य, बिडवाडी हायस्कुल मुख्याध्यापक, बिडवाडीतील जि प शाळांचे प्रभारी मुख्याध्यापक यांचा कोव्हीड योद्धा म्हणून शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सुदाम तेली याना गावच्या वतीने फेटा, शाल ,श्रीफळ आणि पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना तेली यांनी, ” सरपंच म्हणून माझ्या गाववासीयांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी आणि विश्वास हा कायम विकासकामांच्या माध्यमातून जोपासण्याचा मी प्रयत्न केला आहे. आजच्या माझ्या सत्काराने मी भारावून गेलो आहे. आजच्या वाढदिवसानिमित्त समस्त गाववासीयांनी माझ्यावर असलेले प्रेम आणि विश्वास दाखवून दिला. गावच्या विकासासाठी भविष्यात माझ्यावर जी जबाबदारी माझ्यावर द्याल ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन.माझ्यासोबतच माझ्या गावातील अन्य नेतृत्व जर पूढे येत असेल तर त्याच्याही पाठीशी राहीन ” असे तेली यांनी साफदिलाने सांगितले. वाढदिवसानिमित्ताने गावातील युवाई सुदाम तेली यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अधीर झाली होती. बिडवाडी गावातील प्रत्येक वाडीतील युवकांच्या मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तेली याना शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page