जातीवाचक वाडी वस्तींची नावे बदलून महापुरुषांची नावे द्या…

राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष राजेंद्र वराडकर यांची तहसीलदारांकडे मागणी*

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यात गावागावात असणारी वाडीवस्त्यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची नावे देण्यात यावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे मालवण तालुकाध्यक्ष राजेंद्र वराडकर यांनी मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले. याबाबतचे निवेदन तहसीलदार पाटणे यांना सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वराडकर, जिल्हा सरचिटणीस योगेश वराडकर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद कांडरकर, राष्ट्रवादी ग्राहक सेलचे माजी तालुकाध्यक्ष रमण वाईरकर, अल्पसंख्यांक सलीम खान आदी उपस्थित होते. मालवण तालुक्यातील गावांमधील वाडी वस्त्यांची नावे जातीवाचक आहेत. हरिजनवाडी, गवळी टेंब, सुतारवाडी, धनगरवाडी, अशा स्वरूपाची नावे आहेत. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने सदरची नावे तात्काळ बदलून महापुरुषांची नावे देण्यात यावी असा शासन निर्णय काढलेला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप पर्यंत झालेली दिसत नाही. तरी याबाबत सर्व ग्रामपंचायतीना आदेश काढून शासन निर्णयाची अंमलबजावणी करून जातीवाचक नावे बदलण्यात यावीत अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page