⚡कणकवली ता.११-: संजीवनी हॉस्पिटल, कणकवली व अथायु मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 14 एप्रिलला 11 ते 1 यावेळेत संजीवनी हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे.
या शिबिरात अँजिओप्लास्टी, हाडाचे फ्रॅक्चर, गुडघ्याचे लिगामेंट शस्त्रक्रिया, कॅन्सर ऑपरेशन, दुर्बिणीद्वारे मुतखडा व प्रोस्टेट तपासणी केली जाणार आहे. याशिवाय ई.सी.सी., रक्तातील साखर तपासणी, प्रोस्टेट विविष्ठ अँटीजन टेस्ट, लघवीची धार तपासणी केली जाणार आहे. तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरासाठी नावनोंदणी करणे आवश्यक असून नोंदणीसाठी (8928736999) या क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
