⚡देवगड ता.११-: देगवड तालुक्यातील साळशी ग्रामपंचायतीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी उपसरपंच किशोर साळसकर व साळशी विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन सीताराम नाईक यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश या निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे राणेंनी स्वागत केले.
सत्यवान गावकर, अमोल गावकर, धाकू गावकर, नंदू गावकर, शशिकांत साटम, हरी गावकर, अनिल सावंत, केशव लब्दे, लवू लब्दे, मंगेश लाड, मधुकर लाड, नितीन लाड, भाऊ पवार, अमित साळसकर, हर्षल साळसकर, हेमंत गावकर, अर्जुन गावकर, मुरारी सावंत, बाळा मिराशे, शशिकांत देवणे, जगदिश देवणे, महादेव देवणे, पांडुरंग देवणे, हर्षद देवणे, दिनेश सावंत, प्रथमेश नाईक, हर्षद नाईक, अजय नाईक, प्रमोद परब, राज सावंत, गोट्या साळसकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला
