महायुतीचा उमेदवार विजयी होईल…

केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास: कणकवलीत महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन..

⚡कणकवली ता.०६-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही प्रत्येक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची असणार आहे. महायुतीचा उमेदवाराच्या प्रचारासाठी कार्यालय सुरु करण्यात आले आहे. महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर या कार्यालयातून त्याच्या प्रचाराचे कार्य चालेल, असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराचे कार्यालय केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयाच्या परिसरात सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन नारायण राणे हस्ते श्रीफळ तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते फित कापून झाले. याप्रसंगी श्री. राणे बोलत होते. यावेळी आमदार नीतेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, माजी आमदार राजन तेली, माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी जि. प. सदस्य रवींद्र जठार, माजी सभापती मनोज रावराणे, माजी सभापती प्रकाश पारकर, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, माजी तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, शिवसेनेचे तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, भास्कर राणे, कलमठ सरपंच तथा भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी नगरसेविका मेघा गांगण, माजी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, अ‍ॅड. राजेश परूळेकर, महेश सारंग आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले, भाजपचा आज स्थापना दिवस आहे. या दिवसाचे औचित्यसाधून महायुतीच्या उमेदवाराचे प्रचार कार्यालय सुरु करीत आहोत. महायुतीचा जो केणी उमेदवार असेल त्याच्या प्रचाराचे कार्य या कार्यालयातून चालणार आहे, असे त्यांनी सांगितले.
रवींद्र चव्हाण म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याला विक्रमी मतांनी निवडून आणण्याचा संकल्प भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांच्या स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. भाजपचा आज स्थापना दिवस आहे. या दिवसाचे औचित्यसाधून महायुतीच्या उमेदवाराचे प्रचार कार्यालय सुरु केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, दवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 48 मतदारसंघातील प्रत्येक महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मतदारसंघांमधील प्रत्येक पंचायत समिती मतदारसंघात व नगरपालिका, नगरपंचायतीच्या प्रत्येक वार्डात महायुतीच्या कार्याकर्त्यांचे मेळावे घेण्यास सांगितले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशाप्रकारचे मेळावे घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. आरंभी भाजप नेत्यांचे स्वागत प्रभाकर सावंत व अन्य पदाधिकार्‍यांनी केले. सूत्रसंचालन संतोष कानडे यांनी केले. भारत माता की जय, वंदे मातरम्चा नारा रवींद्र चव्हाण यांनी दिला.
यावेळी ‘मोदी साहेब तुम्ह आगे बढो’, हम तुम्हारे साथ है’, ‘महायुतीचा विजय असो’, ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’, ‘नारायण राणे साहेब तुम्ह आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केले.

You cannot copy content of this page