मडुरा हायस्कूलच्या हर्षदा नाईकला सिंधुरत्न टॅलेन्ट सर्च परीक्षेत कांस्य पदक…

⚡बांदा ता.०६-: युवा प्रतिष्ठान नाटळ यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च (एसटीएस) परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल मडुरा प्रशालेची हर्षदा संजय नाईक हीने कांस्यपदक पटकाविले. इयत्ता सहावी मधून एकूण १३ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. परीक्षेत सर्व उत्तीर्ण झाले आहेत.
पाडलोस येथील हर्षदा नाईक व तिच्या पालकांचे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, शालेय समिती सदस्य, पालक शिक्षक संघ, पंचक्रोशीतील सरपंच व ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.

पालक संजय नाईक म्हणाले की, हर्षदाने रात्रंदिवस अभ्यास करून कांस्यपदक पदक मिळवल्याने आम्हाला अभिमान वाटतो.

You cannot copy content of this page