महायुतीचा उमेदवार अडीज ते तीन लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार…

विशाल परब यांनी व्यक्त केला विश्वास ; भाजपा वर्धापन दिनाच्या दिल्या शुभेच्छा..

⚡सावंतवाडी ता.०६-: रत्नागिरी मतदारसंघाचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नसला तरी येत्या दोन-तीन दिवसात त्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे महायुतीच्या माध्यमातून जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी मतदार संघामध्ये तळागाळात जाऊन प्रचार करणार आहे या ठिकाणी महायुतीची ताकद लक्षात घेता अडीच ते तीन लाखाच्या मताधिक्य घेऊन उमेदवार निवडून येणार आहे असा विश्वास युवा उद्योजक तथा भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा प्रदेश चिटणीस विशाल परब यांनी व्यक्त केला.दरम्यान भारतीय जनता पार्टीचा आज ४४ वा वर्धापनदिन असून या निमित्त या पक्षाच्या व संघटनेच्या निर्मितीसाठी व वाढीसाठी अनेकांनी समर्पण केले. त्यांच्या समर्पणातूनच आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते निर्माण झाले आहेत. त्या सर्वांना आपण विनम्रतापूर्वक वंदन करतो असेही श्री परब यांनी सांगितले.

You cannot copy content of this page