⚡कणकवली ता.०६-: प्रेमदया प्रतिष्ठान श्री स्वामी समर्थ मठ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 10 एप्रलिला कळसुली येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा आयोजित केला आहे. यानिनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
पहाटे 4.30 वा. काकड आरती, 7 वा. स्वामींची नित्यपूजा, 8 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, 10.30 वा. कीर्तन, 11.30 वा. महाआरती, 12.30 वा. महाप्रसाद, दुपारी 3 वा. स्थानिक भजनी कलाकारांची भजने, सायंकाळी 5 वा. दिंडी, 6 वा. ह. भ. प. विश्वनाथ महाराज गवंडळकर यांचे कीर्तन, रात्री 9.30 वा. बाळा सावंत प्रस्तुत महान पौराणिक नाटक अमृत गंगा सादर होणार आहे. तरी या सोहळ्यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
