नारायण राणें:केंद्रात मंत्री असलो तरी जिल्ह्यावर पूर्ण लक्ष आहे…
सावंतवाडी :
शिक्षणमंत्री दीपक केसरकर माझ्याबद्दल चांगलं बोलतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. राजकारणात कोण कायमचा दुश्मन नाही जे वाद असतात ते वैचारीक असतात असे मिश्किल बोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काढले. ते सावंतवाडीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, दरडोई उत्पन्नात गोवा, सिक्किम, तमिळणाडू ही राज्ये महाराष्ट्रापेक्षा पुढे आहेत. मी केंद्रात असलो तरी माझं पूर्ण लक्ष जिल्हावर आहे. ३५ वर्षांपूर्वी या जिल्ह्याच दरडोई उत्पन्न ४० हजार होत. आज ते २ लाख ४० हजार आहे. येत्या काळात ते साडेतीन लाखांपर्यंत पोहचवायचे आहे. केंद्रात मंत्री असलो तरी जिल्ह्यावर पूर्ण लक्ष आहे.विरोधकांनी केवळ माझ्यावर टीका करण्याच काम केलं. साधी बालवाडी सुद्धा सुरू केली नाही.
