जयेंद्र परुळेकर:राणें निवडणूक लढवण्यास घाबरले असल्याचे जनतेच्या मनात प्रश्न पडलाय..
⚡सावंतवाडी ता.०२-: देशात 16 कोटी कार्यकर्ते रजिस्टर आहेत असे सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवार मिळत नाही ही शोकांतिका असून ज्यांना आग्रह केला जात आहे ते केंद्रीय मंत्री नारायण राणे स्वतः तयार नाही यावरून ते निवडणूक लढवण्यास घाबरलेत का असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे अशी टीका ठाकरे सेनेचे प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी केली.
श्री परुळेकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली.
