आंबोली जिल्हापरिषद कामतवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रज्ञाशोध परीक्षेत यश…

आंबोली,ता.२: येथील जिल्हा परिषद शाळा कामतवाडी येथील गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत ५ विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत आले आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शिक्षक तसेच ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. जिल्हा परिषद च्या प्रज्ञाशोध परीक्षेत कामतवाडी येथील शाळेचे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

अंश अनिल गावडे,इयत्ता दुसरी ९० टक्के राज्यात ५वा.श्रेयस कृष्णा गावडे, पहिली ८४ टक्के राज्यात ९ वा.श्रावणी कृष्णा गावडे,दुसरी,७६ टक्के राज्यात बारावी,भविष्या उल्हास गावडे,दुसरी,७४ टक्के जिल्हा गुणवत्ता यादीत,सानवी संतोष गावडे,चौथी,८१ टक्के राज्यात २८ वी,तर ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत अंश अनिल गावडे, दुसरी ,९४ टक्के गुण,भविष्या उल्हास गावडे, दुसरी ८४ टक्के गुण मिळवले आहेत.या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक अनिता साबळे ,मुख्याध्यापक श्री.कोले.सर यांचे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केंद्रप्रमुख आर.बी.गावडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उल्हास गावडे,अनिल गावडे,बबन गावडे,सतीश गावडे, गुणाजी गावडे,संतोष सावंत,प्रशांत गावडे, सचिन गावडे तसेच आंबोली ग्रामस्थानी कौतुक केले आहे.

You cannot copy content of this page