महिला दिनानिमित्त साहित्यिका वैभवी चौकेकर यांचे आयोजन
*💫मालवण दि.२३-:* साहित्यिका सौ. वैभवी चौकेकर यांच्या वतीने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर खास महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा दि. ३० मार्च रोजी चौके येथे दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. यातील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम – सोन्याची नथ, द्वितीय- चांदीचे पैंजण, तृतीय- चांदीचे नाणे, तसेच उत्तेजनार्थ पाच बक्षिसे देण्यात येणार असून सर्व सहभागी महिलांना सहभाग पारितोषिके देण्यात येतील. इच्छुक महिलांनी दि. २८ मार्च पर्यंत ९४०३७३४६०८ या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषयक सर्व नियम पाळून ही स्पर्धा घेण्यात येणार आहे, त्यासाठी स्पर्धकांनी सहकार्य करावे असे आवाहन सौ. वैभवी चौकेकर यांनी केले आहे.
