मावळे आम्ही स्वराज्याचे संस्थेचा पुढाकार
*💫मालवण दि.१३-:* मावळे आम्ही स्वराज्याचे या कणकवली विभागाच्या वतीने मसुरे येथील किल्ले भरतगड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी मावळे आम्ही स्वराज्याचे सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख अनिकेत तर्फे, कणकवली उपतालुकप्रमुख राजा पटेलझ खजिनदार मकरंद भोगले, उपखजिनदार नील आचरेकर तसेच या मोहिमेचे नियोजन हेमंत पाटील, सिद्धेश म्हाडेश्वर, भक्ती भाट, अनिकेत बोभाटे, प्रकाश तेली यांनी केले. यावेळी शिवप्रतिष्ठान कोळोशीचे सदस्य, मावळे, आम्ही स्वराज्याचे मावळे संघटनेचे सदस्य, शिवकन्या व इतर उपस्थित होते. आभार अध्यक्ष सुमित कुशे यांनी मानले.
