शिवसेनेचा सचिन वाझेंचे पैसे वाटून जि प सदस्य खरेदी करण्याचा प्रयत्न..

मानसी जाधव यानी पैसे मारले तोंडावर;भाजप एकसंघ:उलट सेनेचे सदस्य फुटणार:राजन तेली

सिंधूदुर्गनगरी ता २३ जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना सत्ता बदल करण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, त्यांचा तो केविलवाना प्रयत्न ठरला आहे. आमच्या तीन सदस्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला. यातील देवगड तालुक्यातील किंजवडे मतदार संघाच्या सदस्या मानसी जाधव यांना दोन लाख रुपये घरी नवून दिले होते. ते पैसे मानसी जाधव यानी परत करीत तोंडावर मारले आहेत. आमचे ३१ ही जिल्हा परिषद सदस्य एकसंघ आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या निवडणुकीत चमत्कार होवून सेनेची सत्ता येवूच शकत नाही. उलट सेनेचे सदस्य भाजपात आल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण सेनेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. सचिन वाझेंचे पैसे घेवून सेना राजकारण करीत आहे. विकत घेवून सत्ता बदल करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक यानी याबाबत तपास करीत हा पैसा कुठून आला ? कोणी आणला ? कशासाठी आणला ? याचा शोध घ्यावा, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यानी पत्रकार परिषदेत केली. जिल्हा परिषद अध्यक्ष दालनात तेली यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी प्रभारी अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, गटनेते रणजीत देसाई, मंदार कल्याणकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page