कणकवली
कणकवली बिडयेवाडी येथे वास्तव्यास असलेल्या संजय रामसिंगर उपाध्याय (३८, मूळ उत्तरप्रदेश) याने राहत्या घरातील सिलिंग फॅन कडील ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना गुरुवारी दुपारी १.३० वा. च्या सुमारास उघडकीस आला. याबाबतची खबर पत्नी प्राची संजय उपाध्याय यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे.
संजय उपाध्याय यांची पत्नी प्राची उपाध्याय दुपारी मुलांना आणायला शाळेमध्ये दिली असता त्याने घराच्या दरवाजा आतून बंद करून घेतला. प्राची मुलांना घेवून दुपारी १.३० वाजता घरी आले असता घराचा मुख्य दरवाजा बंद होता. प्राचीने संजय ला हाक मारली असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिने घरालगत असलेल्या गडग्यावर चढून खिडकीतून पाहिले असता संजय घरातील सीलिंग फॅनच्या हुकाला ओढणीने गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. प्राचीने आरडाओरडा केला असता शेजाऱ्यांनी तेथे धाव घेतली. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश करत ओढणी कापून संजयला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संजयला तपासून मयत घोषित केले.
