आंबडगाव येथे महिलेची आत्महत्या…

⚡दोडामार्ग ता.१३-: आंबडगाव येथील यामिनी राजाराम साटेलकर (वय ६०) यांनी काजूबागेत गळफास लावून घेत आत्महत्या केली.त्या सोमवारपासून बेपत्ता होत्या.

त्यांचा मृतदेह मंगळवारी काजू बागेत आढळला.मद्यपी मुलाने भांडण व मारहाण केल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे.भांडणाच्या रागातून त्या घरातून बाहेर पडल्या आणि काजू बागेत गेल्या.त्या रात्रभर घरी आल्या नव्हत्या.त्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह काजूच्या बागेत झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

You cannot copy content of this page