मर्डे ग्रामपंचायतचे नाव मसुरे करा…

अन्यथा पुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार:भंडारी समाज अध्यक्ष पंढरीनाथ मसुरकर यांची माहिती

⚡मालवण ता.१२-: गेली पाच वर्ष मसुरे डांगमोडे ग्रामपंचायतच्या विभाजनानंतर मूळ मसुरे डागमोडे ग्रामपंचायतचे नाव प्रशासनाने ग्रामस्थांची मागणी नसतानाही मर्डे ग्रामपंचायत असे केले. प्रशासनाच्या या चुकीचा फटका मसुरे या नावाला बसला आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनी प्रशासन दरबारी तसेच सर्वपक्षीय राज्यकर्ते यांच्याकडे या ग्रामपंचायतीचे नाव मसुरे अथवा ग्रामपंचायत च्या नावामध्ये मसुरे असा उल्लेख असावा अशी मागणी वारंवार करूनही अद्याप पर्यंत शासन दरबारी यश आलेले नाही. अनेक वेळा लेखी निवेदने तसेच ग्रामपंचायत ठराव लेखी स्वरूपात दाखल करूनही याबाबत शासन दरबारी कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. ग्रामस्थांचा हा प्रश्न येत्या काही दिवसात सुटला नाही तर येणाऱ्या सर्व निवडणुकांवर येथील ग्रामस्थ बहिष्कार घालण्याच्या विचारात असल्याची माहिती मसुरे भंडारी समाजाचे स्थानिक अध्यक्ष पंढरीनाथ मसूरकर यांनी दिली.


मर्डे ग्रामपंचायत चे नाव मसुरे होण्यासाठी गेली पाच वर्ष मसुरे ग्राम विकास संघ सर्व स्तरावर ती प्रयत्न करत आहे. याबाबत अगदी ग्रामपंचायत ते मंत्रालय पातळीवरतीही आवाज उठवण्यात आला होता. याबाबत मर्डे ग्रामपंचायत ने लेखी स्वरूपात निवेदन सर्व संबंधित वर्गाकडे दिले होते.
मसुरे ग्रामविकास या संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण परब यांनीही वेळोवेळी पाठपुरावा केला होता. ग्रामस्थांची अथवा ग्रामपंचायती मागणी नसतानाही प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने विभाजन करताना या ग्रामपंचायतीचे नाव बदलून मर्डे ग्रामपंचायत असे नामकरण केले. यामुळे मसुरे गावाची ओळख पुसली गेली आहे. असे असतानाही प्रशासन दरबारी कोणतीच दखल घेतली गेली नसल्याने अखेर येत्या निवडणुका वरती बहिष्कार घालण्याचा विचार येतील ग्रामस्थ करत आहेत.

You cannot copy content of this page