प्रसाद मुळे यांची कणकवली पोलिसांत तक्रार
*💫कणकवली दि.२२-:* घराच्या अंगणात उभी केलेली मोटरसायकल अज्ञाताने चोरून नेल्याची फिर्याद प्रसाद रवींद्र मुळे ( रा कलमठ गुरववाडी ) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. हिरो स्प्लेनडर क्रमांक MH 07 -V – 0368 ही प्रसाद मुळे यांनी आपल्या घराच्या अंगणात 18 मार्च रोजी रात्री उभी केली होती. रात्री अडीच च्या सुमारास कुत्रे भुंकण्याचा आवाज आल्याने रवींद्र यांच्या आईने घराबाहेर जाऊन पाहिले असता दोघे अंगणात दिसले. त्यानंतर 19 मार्च रोजी सकाळी मोटरसायकल अंगणात नव्हती. जवळपास शोधूनही मोयरसायकल सापडून आली नाही म्हणून प्रसाद यांनी मोटरसायकल चोरीस गेल्याची फिर्याद कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.
