⚡सावंतवाडी ता.०८-: काजु चोरीच्या गैरसमजातून बेदम मारहाण प्रकरणी आरोपी संजय गावडे यांची सावंतवाडी न्यायालयाने 30 हजार रुपयांच्या जामीनावर मुक्तता केली.
माडखोल येथील काजु बागेत काजु चोरी केल्याच्या संशयातून माडखोल येथील श्री विजय राऊळ याला रिपीने बेदम मारहाण केली व त्यामुळे जखमीचे हात,पाय फ्रेक्चर करून डोक्यावर गंभीर दुखापत केल्यावरून सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध भा. द.वी. कलम 452, 323, 324, 325, 326 अन्वये आरोपी संजय गावडे, रा.आंबोली सेवानिवृत माजी सैनिक श्री. संजय गावडे यांच्या विरुद्ध सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला आज कोर्टासमोर हजर केले असता आरोपीची लायक रक्कम रुपये 30,000/- च्या जामीनावर अटी व शर्ती नुसार न्यायदंडाधिकारी (प्र. व) श्रीमती आर. जी. कुंभार यांनी मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अँड. परिमल नाईक, यांच्या सह.अँड. सुशील राजगे, अँड. रश्मी नाईक, अँड. राहुल मडगावकर,अँड. अमिषा बांदेकर यांनी काम पहिले.
