वैद्यकीय अधिकाऱ्यांशी केली चर्चा: संबंधित मुलांना दिला धीर..
⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावातील शाळेमध्ये शाळकरी मुलांना जेवणामधून विषबाधा झाली त्यांना सांगली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले त्यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी भेट देत सर्व मुलांना धीर दिला त्याच प्रमाणे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांना अधिक उपचाराकरिता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याबाबत सूचना केल्या.
यावेळी प्रथमेश तेली यांच्या समवेत सांगेली सरपंच लवु भिंगारे, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, ग्रा प सदस्य उपस्थित होते
