⚡कणकवली ता.१२-: कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपली वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केलेल्या उपक्रमशील शिक्षिका कै.सौ. उमा महेश काणेकर यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी या उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांच्या सृजनशील लेखनशैलीचा आणि वैचारिक प्रगल्भतेचा अधिक विकास व्हावा यासाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला बहुसंख्य स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
निबंध स्पर्धा -गट पहिला (पाचवी ते सातवी) विषय -१) प्रदुषण रोखण्यासाठी मी केलेले प्रयत्न
२)स्वच्छता अभियानातील माझा सहभाग ३)मी प्राण्यांवर असे प्रेम करतो. प्रथम-नंदिनी विजय राणे (विद्यामंदिर हायस्कूल कणकवली)
द्वितीय -सुयश सद्गुरु साटेलकर (न्यू इंग्लिश स्कूल आचरा, मालवण) तृतीय -श्रेया प्रवीण कदम (एस. एम.हायस्कूल कणकवली)
उत्तेजनार्थ – १)रिया विठोबा ठाकूर (माध्यमिक विद्यालय शिवडाव, ता.कणकवली) २) सिद्धी मनेष वारीक (श्रीराम विद्यालय, पडेल ता.देवगड)
गट दुसरा (आठवी ते दहावी)
विषय -१) अंधश्रद्धा निर्मूलन आणि आजची पिढी २)भारतीय संविधान आणि समता ३)वाचन संस्कृती जोपासण्यासाठी हे व्हायलाच हवे
प्रथम -पार्थ रामनाथ गोसावी (माध्यमिक विद्यालय शिवडाव, ता.कणकवली) द्वितीय-निशाद नंदकुमार कदम (श्रीराम माध्यमिक विद्यालय पडेल, ता.देवगड),तृतीय -ऋतुजा रविंद्र परब (माध्यमिक विद्यालय, शिवडाव.ता.कणकवली)
उत्तेजनार्थ-१)आर्या अरुण नाईक साटम (विद्यामंदिर हायस्कूल कणकवली),२)मयुरेश शाम सोनुर्लेकर (आयडियल इंग्लिश स्कूल, वरवडे, ता.कणकवली)
गट तिसरा-महाविद्यालयीन विषय -१)लोकशाही टिकली तर देश टिकेल २)प्रसार माध्यमे आणि समाज ३)माझा मताधिकार
प्रथम- सविता हनुमंत तांडेल (तृतीय वर्ष, वाणिज्य, वेंगुर्ला)
द्वितीय-श्रावणी संजय वराडकर (वराड कला,वाणिज्य महाविद्यालयीन),तृतीय-श्रेया महेश तावडे (कासार्डे ज्युनियर कॉलेज, कासार्डे)उत्तेजनार्थ -१)साक्षी रामदास चव्हाण (अकरावी सायन्स),२)तन्वी राजन गावकर
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसाठी खुली निबंध स्पर्धा
विषय: १)माझी विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धती २)विज्ञानातील प्रयोग आणि माझे विद्यार्थी
प्रथम- सतीश सिताराम कदम (पदवीधर शिक्षक, जि.प.प्राथ. शाळा आशिये नं.१) द्वितीय-संजय आत्माराम राऊत (सेवानिवृत्त मुख्याध्यापक, जामसंडे)
तृतीय-नीता नितीन सावंत (उपशिक्षिका,जि.प.प्राथ.शाळा शिरशिंगे नं.१,सावंतवाडी)
शालेय गटातील निबंध स्पर्धेचे परिक्षण महेंद्र पवार आणि प्राचार्य सिद्धार्थ तांबे यांनी केले तसेच महाविद्यालयीन गटातील निबंध स्पर्धेचे परीक्षण प्रा. डाॅ.सोमनाथ कदम आणि शिक्षकांसाठी निबंध स्पर्धेचे परीक्षण प्रा.सुचिता गायकवाड यांनी केले.
विजेत्या स्पर्धकांना लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष लेखक महेश काणेकर (9422967547) यांनी दिली आहे.
