⚡रत्नागिरी ता.१२-: सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील विजय पाटील व त्यांचे मित्र आज गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आले होते.अचानक त्यांची ट्रॅव्हल्स गाडी अरे वॅरे रोडवर रविवारी सायंकाळी 5 च्या दरम्यान बंद पडली.जिथे ट्रॅव्हल्स बंद पडली तिथून गणपतीपुळे अंतर 5 ते 6 किलोमीटर होते.ट्रॅव्हल्स गाडी चालू होण्यास काळोख झाल्याने तेथील स्थानिक गावगुंड व दारुडे मुले विनाकारण पाटील व त्यांच्या मित्रांना त्रास देत होते.हि गोष्ट तात्काळ विजय पाटील यांनी त्यांचे कवठेमहांकाळ येथील पत्रकार मित्र सनी लोंढे यांना कळविले.त्यानंतर सनी लोंढे यांनी पत्रकार आबा खवणेकर यांना याबाबतची माहीती दिली.त्यानंतर तात्काळ श्री.खवणेकर यांनी रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगाडे साहेबांना याबाबतची माहीती दिली.तसेच त्यांचा मोबाईल नंबर श्री.लोंढे यांनाही दिला.त्यांनीही मेंगाडे यांच्याशी संपर्क साधला.
तात्काळ पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगाडे साहेब व सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या विशेष सहकार्याने सांगली जिल्ह्यातील तरुणांना मदत मिळाली.तर विजय पाटील व त्यांच्या मित्रांनी श्री.मेंगाडे व श्री.पाटील यांचे आभार मानले.
