राजन तेली यांचं नेतृत्व; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
⚡सावंतवाडी ता.१२-: आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारची यशोगाथा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी व जनतेचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी सावंतवाडी गाव चलो अभियान अंतर्गत बुथ क्रमांक 136 येते भाजपच्य पदाधिकाऱ्यांकडून घरोघरी प्रवास आणि प्रचाराचा अभियान सुरू असून यावेळी लोकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.दरम्यान हा कार्यक्रम सावंतवाडी भाजप विधानसभा प्रमुख राजन तेली यांच्या उपस्थितीत होत असून यावेळी ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष व प्रवासी कार्यकर्ता दिलीप भालेकर यांनी उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले
यावेळी भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी,महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, शक्ती केंद्रप्रमुख धीरेंद्र म्हापसेकर,महेश पांचाळ, बुथ क्र. 136चे अध्यक्ष राघू चितारि, शहर महिला सरचिटणीस मेघना साळगावकर, भाजप युवा मोर्चा चिटणीस बंटी पुरोहित, ज्योती मुद्राळे, महेश म्हापसेकर, गजा कोदे आदी उपस्थित होते
