रुपेश पावसकर; युतीचा धर्म पाळून एकत्रितपणे काम करून विकासाची गंगा आणूया..
⚡सावंतवाडी ता.१२-: दीपक भाईंना जागा दाखवण्यापेक्षा सावंतवाडी मतदारसंघातील लोक येणाऱ्या निवडणुकीत राजन तेलींना तडीपार करतील असा पलटवर शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी आज येथे केला.
दरम्यान मंत्री केसरकर हे युतीचा धर्म पाळतात त्यामुळे तेलीने सुद्धा युतीचा धर्म पाळून हेवेदावे न करता एकत्रितपणे काम करून विकासाची गंगा आणू असेही श्री रुपेश पावसकर यावेळी म्हणाले. श्री तेली यांनी काल राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाला निमंत्रण दिल नसल्याने केसरकर यांच्यावर टीका केली होती त्याला रुपेश पावसकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
