पोखरण नंबर एक शाळेच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार:मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील दशावतार लोककलेची होणार ओळख
सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन निमित्ताने आज सायंकाळी ८ वाजता कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नंबर १ च्या विद्यार्थिनी कृष्ण पूजन (गर्वपरिहार) हे महान पौराणिक दशावतारी नाटक सादर करणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रेरणेतून दाखल झालेल्या पाहुण्यांना सिंधुदुर्गातील दशावतार लोककलेची ओळख करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कृष्ण पुजन ( गर्वपरिहार) या नाटकाची संकल्पना शामसुंदर मधुकर सावंत यांची असून लेखक – प्रकाश तांबे, दिग्दर्शक – नारायण सत्यवान मेस्त्री, सहाय्यक – विजय तुकाराम गुरव, संगीत- विश्राम विजयकांत सावंत, धोंडी बाळकृष्ण सावंत , अर्जुन पंढरीनाथ कोरगांवकर , प्रथमेश प्रकाश तांबे, रंगभूषा- प्रशांत सदाशिव सुतार, पांडुरंग विश्राम सुतार , संदीप काशिराम गावकर वेशभूषा – शैली शामसुंदर सावंत ,दिपाली दिपक सावंत, शर्वरी महेश राजाध्यक्ष ,अक्षता एकनाथ सावंत, गायत्री अतुल बागवे, राधिका दतात्रय परुळेकर अशाप्रकारे सहाय्य लाभत आहे.
या नातिकेत गणपती – ईशा मंगेश संगम, यक्ष – लावण्य दिपक सावंत, मारुती – हर्षदा संदीप गावकर
द्रौपदी – प्रीती प्रकाश डोईफोडे, ब्राम्हण- दीक्षा राजेंद्र शिंदे, अर्जुन – मित्तल दिपक सावंत, भिम – मैत्राली महादेव गुरव, गंधर्व – अदिती एकनाथ सावंत, नारद- वृंदा विश्वनाथ सावंत, श्रीकृष्ण- श्रुती समीर मर्गज, यक्षीण- दिव्या पंकज सावंत अशाप्रकारे विद्यार्थी भूमिका बजावणार आहेत.
