अभय देसाई:परशुराम उपरकर यांच्यावर टीका करणे म्हणजे जमिनीवर राहून सुर्यावर थुंकण्यासारखे..
⚡दोडामार्ग ता.११-: मनसेच्या स्वयंघोषित पक्ष निरीक्षकांनी राजकारणात संघर्ष योद्धा म्हणून परिचित सर्व सामान्य जनतेच्या मनातील व्यक्तिमत्व असलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका करणे म्हणजे जमिनीवर राहून सुर्यावर थुंकण्यासारखे आहे, असे प्रतिउत्तर मनसेचे माजी पदाधिकारी राहिलेले सामाजिक कार्यकर्ते अभय देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिले आहे.
काल गजानन राणे यांनी उपरकर यांच्यावर कुडाळ येथे पत्रकार परिषद घेऊन टीका केली होती. ट्या टिकेला देसाई यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, मुंबईहून पार्सलने आलेल्या मनसेच्या या स्वयंघोषित कामगार नेत्याने जीजी उपरकर यांच्यावर टीका करण्यापेक्षा हिम्मत असेल तर जिल्ह्यात स्वतः निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान देत फुकटचे सल्ले देण्याचे धंदे बंद करावेत असा इशारा दिला आहे. मंदिरात दर्शनाला जाताना स्वतः चे चालतानाचे व्हिडिओ काढून फेसबुक व व्हाट्सअपवर शो ऑफ करणाऱ्या गजानन राणेंनी पक्ष निष्ठेच्या बाता मारू नयेत, प्रसंगी पार उघडे करून टाकू असा सज्जड दमही त्यांनी दिला आहे. 40 वर्षात जिल्हाच्या राजकारणात प्रत्येक गावात पोचून श्री उपरकर यांनी जनतेच्या मनात आपले स्थान अबाधित ठेवले आहे म्हणून आजही जिल्ह्यातील 80% मनसेचे कार्यकर्ते हे जिजींसोबत उभे आहेत हे विसरू नका असे प्रत्युत्तर देसाई यांनी दिले आहे.
