अतूल वार:निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न…
सावंतवाडी ता.११, सहदेव राऊळ -: आज विदयार्थी यांना स्पर्धात्मक युगात पुढे जाण्यासाठी बरीच कसरत करावी लागत आहे. त्यामूळे पालकांनी आपल्या मुलांमधील कलागुण ओळखून त्यांचे करियर घडविणे गरजेचे आहे. शालेय जीवनातील खरा गुरू शिक्षक असतो त्यानें विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन नागपूर येथील नक्षल ऑपरेशन हेडचे अतूल वार यांनी निरवडे येथे केले.
निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. यावेळी कार्यक्रम उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब पाटील, संस्कार नॅशनल स्कूल निरवडे अध्यक्ष नरपत जैन, माजी अध्यक्ष शेखर जैन, सतीश पाटणकर, मुख्याध्यापक हेमंत तानावडे, स्कूल कमिटी शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष निलेश बरकुटे, भालचंद्र गोसावी, राजेंद्र राठोड, भाविल जैन, जवाहर राठोड, कमिटी स्कूल सचिव अनन्या धावडे, स्नेहा भिसे तसेच स्कूल कमिटी सभासद, पदाधिकरी उपस्थित होते
तसेच यावेळी बाळासाहेब पाटील यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलें. यावेळी ते म्हणाले, आज शालेय जीवन हे आयुष्यातील खरी दिशा ठेवणारे केंद्रबिदू आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी स्वतः चे मनोधर्य टिकविणे आता गरजेचे आहे. असे त्यांनी सांगितले. तसेच सावंतवाडी तालुक्यातील निरवडे सारख्या ग्रामीण भागात आदर्शवत विद्यार्थी व स्कूल बनविण्याचे मोलाचे कार्य चंद्रशेखर जैन यांनी केले आहे.
संस्कार नॅशनल स्कूल हे भावी काळात आदर्शवत स्कूल होईल व या विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या पदावर गरुड झेप घेतील, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. शेखर जैन यांनी स्कूलचा सर्वागीण विकास व विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण भावी काळात दीले जाईल असे आश्वासन आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन तेजा मेस्त्री, मनिष सावंत, प्रियांका शिरसाट तसेच शिक्षक कर्मचारी यांनी केले, यावेळी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मनिष सावंत, सुनीता राणे तर उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार स्नेहल गवस यांना संस्कार नॅशनल स्कूलच्यावतीने शेखर जैन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट कर्मचारी शिक्षण पुरस्कार धनश्री सोनुर्लेकर यांना देण्यात आला तर सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार पायल धनकुटे व उत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्कार मॉरिस्का डायस यांना देण्यात आला. कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल तेजा मेस्त्री, मनिष सावंत व सुनिता राणे यांचा खास सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी या प्रशालेतील माजी शिक्षक व माजी विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीष सावंत, अहवाल वाचन मुख्याध्यापक हेमंत तानावडे, सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी तर आभार प्रदर्शन रुपेश सावंत यांनी केले.
