परुळे येथे १४ ते १६ फेब्रुवारी कालावधीत रथसप्तमी उत्सव…

⚡सावंतवाडी : सहदेव राऊळ : परुळे येथील श्री देव आदिनारायण मंदिरात बुधवार १४ ते शुक्रवार १६ फेब्रुवारी या कालावधीत श्री देव आदिनारायण देवस्थानच्यावतीने रथसप्तमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यनिमित्त बुधवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता स्वस्ति पुण्याहवाचन’ वर्सलदार यजमानांकरवी उत्सवाची सुरुवात, सकाळी ८.३० वाजल्यापासुन लघुसौर’ – ब्राम्हवृंदाकरवी सौरसुक्त आवर्तने, सायंकाळी ४ ते ६ वाजता डॉ. सौ. तेजस्वीनी देसाई, दाजी गोसावी व पवन प्रभू यांचे गायन, सायंकाळी ६ वाजता श्री आदिनारायण भजन मंडळ, परुळे यांचे भजन, सायंकाळी ७ वाजता श्रींची आरती, रात्री ८.३० वाजता ह. भ. प. विनोद बुवा चारी, गोवा यांचे कीर्तन, गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजल्यापासुन लघुसौर, सायंकाळी ४ ते ५ वाजता प्रणव मेस्त्री, नेरुर यांचे पखवाज सोलोवादन, सायंकाळी ५ ते ७ वाजता रामकृष्ण हरी भजन सेवा संघ, तेंडोली यांच्या बाल भजन मंडळाचे भजन, सायंकाळी ७ वाजता श्रींची आरती, रात्री ८.३० वाजता राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. संदिप बुवा मांडके (जेजुरी) आणि ह. भ. प. श्री. संकेत बुवा भोळे, वडोदरा (गुजरात) यांची कीर्तन जुगलबंदी होणार आहे. शुक्रवार १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजल्यापासुन लघुसौर, दुपारी १२ वाजता तेजोनीधी भगवान श्री आदिनारायणांची रथाधिष्ठीत महापुजा, दुपारी १ पासुन महाप्रसाद, दुपारी ३ ते ४ वाजता सार्वजनिक हळदीकुंकू, दुपारी ४ ते ७ वाजता ह.भ.प. श्री. संकेत बुवा भोळे, वडोदरा (गुजरात) यांचे कीर्तन, सायंकाळी ७ वाजता श्रींची आरती, सायंकाळी ७.३० वाजता शालेय स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ, रात्री ९ ते ११ वाजता पुराणवाचन, श्रींची सवाद्य पालखी प्रदक्षिणा, रात्री ११ ते १ वाजता सिंधुरत्न श्री. भाऊ नाईक बुवा, वेतोरे यांचे कीर्तन, रात्री १.३० वाजता जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ, आरोस यांचा दशावतारी नाट्यप्रयोगसादर होणार आहे. या आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांचा भक्तगणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव आदिनारायण देवस्थान-परुळे देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page