संदीप दळवीं; आमच्या पक्षाच्या नावावर दुकान चालत असेल तर आम्हाला आनंद; उपरकरांच्या जाण्याने जिल्ह्यात मनसेवर कोणताही परिणाम नाही…
⚡सावंतवाडी ता.११-: परशुराम उपरकर यांनी जर पक्ष सोडला तर आता शहरात लावण्यात आलेले बॅनरवर माझी मनसैनिक लिहीण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. जर आमच्या नावाने त्यांचं दुकान चालत असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य पक्ष निरीक्षक संदीप दळवी यांनी आज येथे लगावला.दरम्यान मनसेच्या वारंवार बैठकीला ते अनुपस्थित राहायचे. वारंवार वेगवेगळी आजाराची कारणे देत असल्याने त्यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आल्याचेही श्री दळवी यांनी यावेळी सांगितली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी श्री दळवी पुढे बोलताना, गेल्या दहा वर्षात परशुराम उपरकर यांनी जिल्ह्यात मनेसेची संघटना किती वाढवली ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उपरकर हे जरी पक्षातून बाहेर पडले असलेतरी पक्षावर त्यांचा कोणताही परिणाम होणार नसून यापुढे मनसे जनतेच्या प्रश्नांवर लक्ष देऊन कुठे अन्याय होत असेल तिकडे मनसैनिक ताकतीनिशी उभे राहून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान जिल्ह्यातील आरोग्याबाबत येणाऱ्या काळात मनसे आवाज उठवून तो प्रश्न देखील मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे श्री दळवी यांनी यावेळी सांगितले. दरम्यान उपरकर हे पुन्हा जर मनसेत येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू. परंतु त्यांना शून्यापासून काम करावे लागेल, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
दरम्यान आगामी होणाऱ्या निवडणुकांमध्ये मनसैनिक सर्व निवडणुका लढवणार असून त्यावेळी चांगल्या उमेदवारांना संधी देखील देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पक्ष निरीक्षक गजानन राणे, राज्य सरचिटणीस संदीप दळवी, महेश परब सावंतवाडी विधानसभा संपर्क अध्यक्ष, अनिल केसरकर जिल्हाअध्यक्ष केतन सावंत विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष, बाळा पावसकर जिल्हासचिव, सुधीर राऊळ, कुणाल किनळेकर उपजिल्हाअध्यक्ष, गुरुदास गवंडे विधानसभा सचिव सावंतवाडी, सचिन सावंत विधानसभा सचिव कुडाळ, प्रभोद राऊळ वाहतूक सेना अध्यक्ष विक्रोळी, मिलिंद सावंत तालुकाअध्यक्ष सावंतवाडी,हेमंत जाधव कुडाळ तालुकाअध्यक्ष, सचिन पाटणकर सावंतवाडी विद्यार्थी सेना संपर्कअध्यक्ष, राजेश मामलेदार, अतुल केसरकर उपतालुकाध्यक्ष, ग्रा. प. सदस्य, नरेश देऊलकर,अक्षय पार्सेकर, विभागअध्यक्ष काशीराम गावडे, विष्णू वसकर, तसेच साई तळकटकर, अभिजित खांबल, नाना देसाई, अभिमन्यू गावडे, श्रीराम सावंत, संदेश शेट्ये, प्रतिक मालवणकर, सुनील आसवेकर आदी उपस्थित होते.
.
