विशाल परब यांची माहीती ; मंत्री रविंद्र चव्हाण, माजी खास. निलेश राणे,आम.नितेश राणे राहणार उपस्थित..
सावंतवाडी ता.१०-:
सिंधुरत्न जॉब फेअर साठी सिंधुदुर्ग- रत्नागिरीतून सहा हजारहून अधिक युवकांनी आपलं रजिस्ट्रेशन केलं आहे त्यामुळे 12 तारखेला सकाळी सात वाजता जे हजर होणार तसेच त्यांचा रजिस्ट्रेशन जरी नसलं तरी त्यांना आम्ही प्रथम प्राधान्य देणार, अशी माहिती भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज येथे दिली.दरम्यान युवकांचा मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे आम्ही सर्वजण भारावून गेलो आहे असे गैरउद्गार देखील श्री परब यांनी यावेळी काढले.ते सावंतवाडी जिमखाना मैदानावर शुक्रवारी सिंधू रत्न जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले असून त्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली यावी ते बोलत होते.
यावेळी विशाल परब पुढे बोलताना म्हणाली की, भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा च्या वतीने शुक्रवारी सिंधूरत्न जॉब फेअर चे आयोजन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी युवकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र, कोणाचे रजिस्ट्रेशन झालं नसली तरी आम्ही त्यांना समाविष्ट करून घेऊ असे, यावेळी स्पष्ट केले. दरम्यान या कार्यक्रमाला भाजपचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्यासह जिल्हास्तरीय नेते उपस्थित राहणार आहेत. तरी यावेळी कार्यक्रमाला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील उपस्थित रहावे असे आवाहन देखील श्री परब यावेळी केले. तसेच सर्व युवक युवतींनी या कार्यक्रमांना सकाळी सात वाजल्यापासूनच आपली हजेरी लावावी, असे आवाहन देखील श्री परब यांनी यावेळी केले आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावले,अँड.अनिल निरवडेकर,दिलीप भालेकर, विकास परब, हेमंत बांदेकर,आदी उपस्थित होते
