रुपेश पावसकर:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला शिवधनुष्यबाण काँग्रेस राष्ट्रवादीच्या तावडीतून मुक्त केली..
⚡कुडाळ ता.१०-:विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असा निर्णय दिला. यावर सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना संघटक रुपेश पावसकर यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, आजचा निकाल ऐतिहासिक होय. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी संघटना आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता जे काही बाळासाहेबांचे सत्यवादी विचार आहेत त्याला अनुसरून निर्णय दिला.
त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन जास्तीत जास्त कार्यकर्ते हे पक्ष प्रवेशासाठी इच्छुक आहेत. तसेच या निर्णयामुळे उबाठा गटाने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा करून बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवल्याने ठाकरे गटाला हा मोठा हादरा असल्याची टीका केली. शिवसेना हिंदुत्ववादी संघटना असल्याने आपण या निर्णयाचे स्वागत करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला शिवधनुष्यबाण काँग्रेस राष्ट्रवादीच्या तावडीतून मुक्त केल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.
